दुष्काळी हमी
कुणी खचुन गेले
कुणी त्रासुन मेले
दुष्काळ सोसताना
सुख रूसुन गेले
तरी देखील इथे
गांभिर्य ना समजले
दुष्काळाने कित्तेकांचे
जीवनांकुर कोमेजले
पाणी फक्त पिण्याचे नव्हे
वापरण्याचेही कमी आहे
तरीही दारू बनवण्यासाठी
कित्तेकांनी घेतलेली हमी आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा