हा ब्लॉग शोधा

शनिवार, १३ फेब्रुवारी, २०१६

स्वप्नातली परी,...

स्वप्नातली परी,....

                कवी :- विशाल मस्के,सौताडा.
                मो. :- 9730573783

मनात पोचतो,खुदकन हसतो
आठवण तुझीच येते गं
माझ्या मनातील कोना-कोनात
प्रीत ही तुझीच जागते गं

डोळ्यांच्याही पापण्यांमध्ये
अस्पष्ट तुझं हसणं गं
सांग शब्दांत मी घेऊ कसं
तुझं प्राजक्ताचं हे दिसणं गं

ओठ गुलाबी घेऊन सखे
तु नजरेतुन गं मिरवतेस
तुझ्या प्रेमाचं मंजुळ गाणं
मनात माझ्या फिरवतेस

मी देतो तुजला हाक आणि
तु अस्पष्ट-अस्पष्ट भासते
का कळेना सांग साजनी
तुला माझ्या मनातील आस ते

तुला पाहण्या माझे गं
मन मनापासुन वेडावले
मी येताच मागे-मागे
तु का पुसुन जाते पावले

त्राण हरपते,भान हरपते
झाक जाते गं डोळ्यांतली
मग मलाही कळून येते
तु परी आहेस स्वप्नांतली

का तुटले गं स्वप्न माझे
मी होतो सताड बावरा
या मनाला सावरण्याला
मज दे तुझाच सावरा

रातंदिस मी तडफडतो गं
तुझ्या विरहाच्या विस्तवात
तुजसाठी मी अातुर झालो
तु ये स्वप्नातुन ये वास्तवात,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

---------------------------

* सदर कविता नावासहीत शेअर करू शकता.
* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा