हा ब्लॉग शोधा

सावधान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सावधान लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, १३ जून, २०१७

तडका - सावधान

सावधान

अगदी मनासारखा पाऊस
आता सर्वत्रच पडतो आहे
तसा पुलांच्या सुरक्षिततेचा
मनात विचार वाढतो आहे

गुत्तेदारीच्या नीच कामांची
दशा मनात ओळखली जावी
अन् पुला-पुलांवरून जाताना
सावधानता बाळगली जावी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ११ मे, २०१७

तडका - सावधान

सावधान

दिसले जरी सभ्य
तरीही फसु नका
घातक अंधश्रध्देत
लोकहो ग्रासु नका

या फसव्या प्रकाराने
लोकही त्रस्त झालेत
अंधश्रध्देमुळे कित्तेक
इथे ऊध्वस्त झालेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३