~!!! उठ बाई तु जागी हो,... !!!~
का वैचारिक प्रगतीची
अजुनही दिरंगाई आहेस
समाजही सांगतो आहे
की बाई तु बाई आहेस
बाईला समानता देणं
गलिच्छ मानलं जातंय
तुझं बाई पण आजही
का तुच्छ मानलं जातंय
का बाईकडे पाहताना
समाज झालाय आंधळा
बाईविना खरं तर हा
समाज होईल पांगळा
आजही नाकारलं जातं
बाई तुझ्या स्वातंत्र्याला
आजही बंदी आहे तुझ्या
त्या मंदीरातील प्रवेशाला
घरा-घरात बसली आहेस
थोडसं बाहेर येऊन बघ
प्रश्न आहे तुझ्या हक्काचा
सावित्रीची लेक होऊन जग
बाई तु समानतेचा लढा दे
पुरोगामित्वात सहभागी हो
दुसर्यांची वाट पाहूच नको
आता ऊठ बाई तु जागी हो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
* कविता आवडल्यास नाव न काढता शेअर करण्यास परवानगी.
* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा