---------- सरजी --------
शाळा आणि कॉलेज सह
जगण्यातुनही शिकतो आहोत
जेव्हा-जेव्हा आठवेल तेव्हा
सरजी तुम्हाला घोकतो आहोत
आपली शाळा अन् कॉलेजही
हल्ली मनामध्ये भरतंय
तुमच्या एका-एका आठवणीनं
मन पुन्हा पुन्हा स्फूरतंय
ते दिवस भुतकाळी असले
तरी वर्तमानात भारी आहेत
अन् आमचे भविष्यकाळही
त्यांच्याच तर दारी आहेत
तुमच्या ज्ञानाची पुरचुंडी
अजुनही पुरली आहे
सगळ्यांना वाटत आलो तरी
अजुनही तेवढीच उरली आहे
दिलंत तुम्ही ज्ञान असं
जे वाटल्यानं वाढतं आहे
ओथंबलेल्या माणूसकीनं
माणसांना माणूस जोडतं आहे
ज्याच्या-त्याच्या पध्दतीनं
जो-तो गुरूजी सांगतो आहे
प्रत्येक-प्रत्येक यश संबंध
शिक्षकांशी येऊन थांबतो आहे
कुणी विस्तारित सांगितले
तर कुणी सांगितले थोडके
जणू चिखलापासुन म्हणे
सरांनी घडवले मडके
पण मी आरोप करतो
ते बोलत नाहीत खरे
कारण सरजी मडके नाही
तुम्ही हिरे घडवलेत हिरे,...
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा