हा ब्लॉग शोधा

रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

समाजाची शान

समाजाची शान

इवल्या इवल्या लेकरांना,देऊनिया जाण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||धृ||

आदर्श त्यांचे कार्य
आदर्श आहे माया
समाजास दिधली
हि साक्षरतेची छाया

मना-मनात भरले आहे,जीवनाचे ज्ञान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,.||१||

या समाजाचा पाया
करूनिया भक्कम
या समाजास केले
शिक्षकांनी सक्षम

समाजाचे समाजाला,देऊनिया भान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||२||

ज्ञानार्जनाने त्यांच्या
घडून आली क्रांती
मशाल झाली आहे
विकासाची पणती

भरभराटीच्या वेगात,भरूनिया त्राण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||३||

इंजिनियर झालेत
झालेत कुणी डॉक्टर
त्यांचेच हो विद्यार्थी
झाले आहेत कलेक्टर

त्यांनीच निर्माण केली,हि वकिलांची खाण
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||४||

जडण-घडण ही
त्यांनीच सारी केली
म्हणूनच शोभा
या समाजास आली

अशा शिक्षकांचा,मनी दाटतो अभिमान
शिक्षक हे ठरले,समाजाची शान,...||५||

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता ऐकण्यासाठी व डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा