हा ब्लॉग शोधा
मंगळवार, ५ मार्च, २०२४
मैत्री
रविवार, ५ ऑगस्ट, २०१८
तडका - मैत्री
मैत्री
रक्ताचं नातं नसलं तरी
मनामध्ये जपलेलं असतं
आपल्या सुख-दु:खांना
मैत्रीणेच टिपलेलं असतं
म्हणूनच मैत्रीच्या विषयानं
मन अगदी ऊत्साही होतं
सर्वात जवळचं नातं म्हणून
सदैवच जाहीर ग्वाही देतं
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६
मैत्री
------(} मैत्री {)------
कवी : विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
मैत्री तर अशीच असते ना
कधीही,कुठेही,काहीही
अगदी हक्कानं बोलणारी
समजुन घेणारी,सांगणारी
आनंद देणारी अन् घेणारी
चुका शोधणारी,सांगणारी
रूसवे फुगवे होऊन देखील
स्तुती करणारी,खेचणारी
मनात कधी न टोचणारी
हेवे-देवे ठेचणारी
एकमेकांच्या मनाच्या
गाभार्यात पोहचणारी
अविश्वासाच्या दरीत
चुकुनही न खचणारी
दुर असुन सुध्दा सदैव
जवळ-जवळ भासणारी
एकांतात असतानाही
आठवणीनं हसवणारी
एकमेकांना आपुलकीनं
सदा आपलंसं करणारी
प्रत्येक-प्रत्येक वादळात
न डगमगता टिकणारी
एकमेकांना साथ देत-देत
जीवनात अविभाज्य होणारी
या सर्वांची प्रचिती तर
मला तुझ्याकडून आलीय
हि मैत्रीच तर असते ना,.?
म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केलीय
* विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.9730573783
तडका - मैत्री
मैत्री
मना-मनात रूचणारी
मैत्री असावी टिकणारी
लाचारीला बळी पडून
मैत्री नसावी विकणारी
ऊमेदीचे बळ देखील
मैत्रीमधुन प्राप्त व्हावे
मैत्रीला जपावे असे की
जीवन देखील तृप्त व्हावे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३