हा ब्लॉग शोधा

रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

करंजी बोले अनारस्याला

-----( करंजी बोले अनारस्याला )-----
''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''''

करंजी बोले अनारस्याला
भाऊ दिवाळी आली आहे
गरम-गरम उकळत्या तेलात
तळायची वेळ झाली आहे

मग अनारसे बोले करंजीला
मनी भीती का जमवली आहे
आपल्या कित्तेक पुर्वजांनीही
स्वादिष्ट चव कमवली आहे

आज त्याचाच फायदा होतोय
लोक आवडीने खाऊ लागलेत
मोजक्या-मोजक्या पदार्थांत
नाव आपलंच घेऊ लागलेत

त्यांनीच अस्तित्व दिलंय हे
मग त्यांच्याच हातुन मोडू दे
अन् घरा-घरात दिपावलीचा
आता आनंद सर्रास वाढू दे

करंजी बोलली हसुन हसुन
समजलं रे माझ्या भाऊराया
आपल्या पुर्वजांची परंपरा
नाही जाऊ देणार मी वाया

हे सारं काही कळून देखील
मी मुद्दाम तुला घुमवले आहे
माणसांची सेवा करण्यातंच
आपले सौख्य सामवले आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783
_______________________

* व्हाटस्अप वरून डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर : 9730573783

* सदर कविता शेअर करण्यास परवानगी

* www.vishalmske.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा