--------------------} नयन भावना {------------------
माझ्या नयनाची कामना,पुरेपुर होऊ दे
तुझ्या नयनात सखे,खोल खोल पाहू दे
भारावलो मी हरवलो,प्रेमात गं तुझ्या
शोधतो मलाच मी, नयनात गं तुझ्या
आठवणी या हूंदक्यात,मावेनात गं
जीर्ण जीर्ण झालो मी,तुझ्या प्रेमात गं
ऐकुनी ये तु सत्वरी,हाक ही जुनी
तुझ्या विना मनाची,काया हि उणी
नको देऊस सये,असह्य ती उपेक्षा
लयास जा तु घेऊनी,माझी ही प्रतिक्षा
मनामध्ये तुझ्या,मला तु सामावुन घे
जीवनात माझ्या,तु विना विलंब ये
आपल्या गं जगण्याला,देऊया ऊभारी
जिद्दीची एक दिमाखात,घेऊया भरारी
सखे तु न् डगमगता,हातात हात दे
तुला देईन साथ मी,तु मला साथ दे
आयुष्याच्या पटलाला,नवा रंग देऊ
सुख-दु:खे कवटाळत,संग संग राहू
माझ्या नयनाची कामना,पुरेपुर होऊ दे
तुझ्या नयनात सखे,खोल खोल पाहू दे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783
-------------------------------
* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी
* सदरील कविता ऐकण्यासाठी आणि चालु घडामोडीवर आधारीत वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
www.vishalmske.blogspot.in
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा