हा ब्लॉग शोधा

सोमवार, ३१ जुलै, २०१७

तडका - सिलेंडर कर डर

सिलेंडर कर डर

होईल सबसिडीही रद्द
आकडा नेहमी वर असेल
सिलेंडर दर वाढीचं
लोकांना मोठं डर असेल

जशी मनमानी वाटेल तसं
बिंधास्तपणे रेटलं जाईल
नव-नवे कर लाऊन लाऊन
ग्राहकांनाही लुटलं जाईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - कार्य पध्दती

कार्य पध्दती

इकडे गर्दी तिकडे गर्दी
बँकेसमोर दाटली आहे
लवकर नंबर लावण्या
रांगेस रांग तटली आहे

त्रासदायक ठरतील अशा
समस्या ना ऊगवल्या जाव्यात
सहज सुलभ होतील अशा
पध्दतीही राबवल्या जाव्यात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ३० जुलै, २०१७

तडका - बाजार टेलिकॉम

बाजार टेलिकॉम

टेलिकॉम कंपन्यांची कानी
रोज नव-नविन ऑफर आहे
ग्राहकांतही आहे ऊत्सुकता
कोणती ऑफर टॉपर आहे

जो परवडेल तोच आपला
समाजात समज पसरला आहे
अन् टेलिकॉम कंपन्यांचा जणू
बाजार आता घसरला आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २९ जुलै, २०१७

तडका - अडलेला निकाल

अडलेला निकाल

आता लागेल,मग लागेल
निकालाची वेटींग आहे
मुंबई विद्यापीठ निकाल
जणू घसरली सेंटींग आहे

इकडून आणि तिकडूनही
होऊ लागला कालवा हो
विद्यार्थ्यांचं हित जपण्या
सेटींग जराशी हलवा हो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २७ जुलै, २०१७

तडका - फॅक्ट

फॅक्ट

कितीही वागलं सरळ तरी
म्हणे लोकांना दिसत नाही
सरळ सरळ वागलेलं इथे
लोकांच्या मनी बसत नाही

नको तितकी मनी दाटलेली
वरवर वाढती नाराजी आहे
मात्र इतरांना समजुन घेण्या
इथे कुणाीच ना राजी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - रस्ते सुरक्षा

तडका

रस्ते सुरक्षा

इकडून खड्डे,तिकडून खड्डे
खड्डेच खड्डे आहेत रोडवर
अन् खड्डे बुजण्यासाठी इथे
अहो जोडही दिलेत जोडवर

रस्त्यातील प्रत्येक खड्डयास
जरा गांभिर्याने पाहिलं जावं
रस्ते सुरक्षिततेसाठी प्रशासन
सदा कर्तव्यदक्ष राहिलं जावं

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २५ जुलै, २०१७

तडका - ऑफर

ऑफर

ऑफर वरती ऑफरचा
भलता भडीमार आहे
जिकडे-तिकडे ऑफरचे
खुले झालेले द्वार आहे

ऑफर दिसेल तिकडेच
लोकांचाही ओघ असतो
मनाला भरळ पाडणारा हा
ऑफर नामक रोग असतो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २३ जुलै, २०१७

तडका - खरं बोल

खरं बोल

हे बोलले-तेही बोलले
आता सारे बोलु लागले
विडंबनाचा चेंडू लोक
विनोदाने झेलु लागले

विडंबनात असला तरी
सारा झोलम् झोल आहे
ज्याच्या-त्याचा तोंडातुन
'आता तरी खरं बोल'आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - माप-पाप

माप-पाप

माप देणे अन् माप घेणे
व्यवहाराची बाजु आहे
पण माप चोरण्याचीही
नको तितकी खाजु आहे

व्यवहारी माप देता-घेताना
मापात पाप करतात लोक
माणसांनी माणसांशी जपलेली
इमानदारीच चोरतात लोक

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २१ जुलै, २०१७

तडका - फॅक्ट ऑफ मर्जी

फॅक्ट ऑफ मर्जी

वेगा-वेगात धावले हो
कुणी रागा-रागात तावले
पण जे निपचित होते
बघा त्यांनाच यश घावले

इथे मुळीच विषय नाही
कुणाची कशी टॅक्ट आहे
न धावताच नंबर येणे
हा मर्जीवरचा फॅक्ट आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १९ जुलै, २०१७

तडका - नैसर्गिक आशा

नैसर्गिक आशा

एकदा तोंड दाखवुन
तो आता रूसला आहे
त्यावर विश्वास ठेऊन
शेतकरी फसला आहे

बरसण्यासाठी निसर्गाने
आता विलंब लाऊ नयेत
शेतकर्यांचे स्वप्न सारे
कोमेजुन जाऊ नयेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १८ जुलै, २०१७

तडका - वाय फाय

वाय फाय

हल्ली नेटचा वापर
गरजेचा झाला आहे
वाय-फायचा विषय
चर्चेचा झाला आहे

जिथे वाय-फाय आहे
तिथे गर्दी जमु लागली
प्रगती वा अधोगती पण
तरूणाई तर रमु लागली

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १७ जुलै, २०१७

तडका - पाऊस काळात

पाऊस काळात

धो-धो पडला पाऊस
दाटून आलाय ऊर
चिंताग्रस्त मनातुनही
आनंदी निघला सुर

मात्र पाऊस काळात
जागरूकतेने वागावे
दुर्घटनांना टाळण्यास
जाणीवपुर्वक जागावे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १५ जुलै, २०१७

तडका - नाते संबंध

नाते संबंध

हल्ली प्रवास म्हणजे
खड्ड्यांवरची कसरत
रस्ता दिसतो कमी अन्
खड्डेच आहेत पसरट

कितीही चुकवलं टायर
खड्ड्यातच जातं आहे
रस्ते आणि खड्डे यांचं
अतुट असंच नातं आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १४ जुलै, २०१७

तडका - जरा सावरा हो

जरा सावरा हो

चुकला जरी पाय तरी
पुन्हा नव्याने सावरा हो
सतत चुकणार्या मनास
संयमाने आवरा हो

त्याच त्याच चुकांचे
वारंवार सोंग नको
आपल्याच हातुन
नैतिकतेचे भंग नको

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १३ जुलै, २०१७

तडका - एक आव्हान

एक आव्हान

लाच दिल्या घेतल्याचे
रोज नवे आरोप आहेत
लाच देऊ-घेऊ नका हे
आमचे प्रांजळ निरोप आहेत

मनाची नसेल जरी तरी
जरा जनाची तरी ठेवा हो
सारं भ्रष्टाचाराचं कारस्थान
व्यवहारा बाहेर लावा हो

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ११ जुलै, २०१७

तडका - सेल्फी पटुुंनो

सेल्फी पटुुंनो

जिथे असतो धोका
तिथेच वाटतो मोका
तरी देखील मनास
सेल्फीपासुन रोखा

स्वत:ला स्वत: जपा
विचार खोलाचा आहे
सेल्फीपेक्षा नक्कीच
जीव हा मोलाचा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, १० जुलै, २०१७

तडका - मी शेतकरी बोलतोय

मी शेतकरी बोलतोय

मनात लागलीय आशा
कर्जमाफी होईल म्हणून
मन भलतं खुललेलं आहे
गोड बातमी येईल म्हणून

पण नुसत्या आश्वासनांचाच
मिडीयात तो आवाज झुलतोय
अहो,आधी करावे मग सांगावे
होय,मी हे शेतकरी बोलतोय

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ९ जुलै, २०१७

तडका - शिक्षकांनो

तडका

शिक्षकांनो

नको तितका धाक देऊन
देऊ नये चुकीचा मार
विद्यार्थ्यांना देण्या प्रेम
खोला जरा मनाचे द्वार

प्रेमानं सांगावं समजुन
जरी झालीच चुकी
विद्यार्थ्यांनाही वाटावी
शिक्षकांविषयी आपुलकी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ७ जुलै, २०१७

तडका - नैसर्गिक पिडा

नैसर्गिक पिडा

ज्याचे त्याचे लक्ष
पावसाकडे आहे
पण पाऊस येणे
हे एक कोडे आहे

केव्हा येईल-जाईल
न् सुटता तिडा आहे
पावसाचा असमतोल
हि नैसर्गिक पिडा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ५ जुलै, २०१७

तडका - वागणे

वागणे

माणसा-माणसांमध्ये
आपुलकी वाढवावी
कटू मनाची कायाही
सत्कार्यास न नडवावी

मनातील सारे क्रोध
मुद्दाम दुय्यम ठेवावेत
माणसांनी वागण्यात
सदैव संयम ठेवावेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, ४ जुलै, २०१७

तडका - काळजी

काळजी

प्रत्येकाला वाटतं
सुरक्षित रहावं
स्वत:सह आपल्यांना
सुरक्षित पहावं

मग हेच द्योतक हेरून
कोणी वागु नये निष्काळजी
अन आपण आपल्यासह
इतरांचीही घ्यावी काळजी

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - टिका

टिका

अहो राजकारण म्हटलं की
टिकांचे भलते वार असतात
कधी समोरा-समोर तर कधी
शालजोड्याचे मार असतात

कुठे तेज तर कुठे कुठे
टिका सहज मध्यम असते
पण विरोधकांची टिकाही
प्रसिध्दीचं माध्यम असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सरपंच निवड

सरपंच निवड

जुने नियम आता
मोडले जातील
जनतेतुन सरपंच
निवडले जातील

रंगबाज राजकारणाचा
कोंब खुडला जाईल
आकडे जुळवणीचा
खेळही मोडला जाईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २ जुलै, २०१७

तडका - कर दर वर

कर दर वर

जी एस टी चा परिणाम
आता दिसु लागला
लागु झालेला वाढीव दर
वस्तुंना ग्रासु लागला

काय काय महाग झाले
याची जोरात चर्चा आहे
महागलेल्या दरांवरती
इथे शाब्दिक मोर्चा आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३