हा ब्लॉग शोधा

मंगळवार, २८ फेब्रुवारी, २०१७

तडका - विश्वास

विश्वास

विश्वास पुर्ण वाटला तर
अंगी वाढून येतो जोर
तर कधी ठरतात कमजोर
अती विश्वासाचेही दोर

मात्र आपल्या वागण्याने
विश्वास कुणाचा तोडू नये
जपावा इतका विश्वास की
विश्वास कमजोर पडू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २७ फेब्रुवारी, २०१७

तडका - फोडा-फोडी

फोडा-फोडी

राजकीय जुळवा-जुळव
भली मोठी कसरत असते
कधी-कधी वारे ऊभरते तर
कधी-कधी वारे ओसरत असते

ज्याच्या-त्याच्या विचारांचे
वेग-वेगळे तत्व असते
म्हणूनच राजकीय घडामोडींत
फोडा-फोडींना महत्व असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - एकीचे बळ

एकीचे बळ

एक विचार असेल तर
एकी जुळून राहते
एक विचार नसेल तर
एकीच टळून जाते

जरी घमेंड दाखवण्या
अग्रेसर स्वबळ असते
तरीही एकीचे बळ हे
नेहमीच प्रबळ असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - पद

पद

ज्याला त्याला इथे
हवे आहेत पद
पदासाठी प्रत्येकाची
चालु असते खदखद

मात्र पद प्रत्येकाला
कधी मिळत नसते
तरी पदासाठी मन
सदा जळत असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, २४ फेब्रुवारी, २०१७

तडका - बोलण्यातील सत्य

बोलण्यातील सत्य

बोलायला येतं म्हणून
कुणी काहिही बोलु शकतो
कुणी बोलण्याने हसवु शकतो
तर कुणी-कुणी जाळू शकतो

बोलण्याचा कसा वापर करावा
हे ज्याचं-त्याचं गणित असतं
मात्र कित्तेकांच्या बोलण्यात
बढाईपण हे अगणित असतं

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - सल्ला मोलाचा

सल्ला मोलाचा

जिद्दीने तर सारेच लढतात
पण विजय नसतो सर्वांचा
कुणी हारतात कुणी जिंकतात
हा सिलसिला असतो पर्वांचा

विजय जरी भेटला तरीही
कधीच मन हूरळू देऊ नये
अन् पराजय जरी भेटला
तरी ऊगीच खचुन जाऊ नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २२ फेब्रुवारी, २०१७

तडका - गुलाल

गुलाल

जसा कल बदलेल
तसे निकाल बदलतात
मात्र प्रत्येक विजयात
गुलालच ऊधळतात

कधी यांच्या कधी त्यांच्या
अंगावरती पडला जातो
विजयाचा आनंदोत्सव
गुलालातच मढला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - निकालाची ओढ

निकालाची ओढ

मतदान झाले पण
निकाल बाकी आहे
अन् निकाला आधीच
इथे तर्क फेकी आहे

मना-मनाला फूटलेला
धडधडीचा मोड आहे
ऊत्सुकलेल्या नजरांना
निकालाची ओढ आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २१ फेब्रुवारी, २०१७

तडका - चढता पारा

चढता पारा

कितीही मनाला आवरलं तरी
खटकणार्या गोष्टी खटकतात
कितीही नको नको म्हटलं तरी
नैसर्गिक बदल हे सरपटतात

जीवाला घातक वाटेल असा
ऊन्हाचा जोर वाढू लागलाय
अन् वातावरणातील गरमीसह
डोक्याचा पाराही चढू लागलाय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २० फेब्रुवारी, २०१७

तडका - हल्लाबोल

हल्लाबोल

शाब्दिक चकमक घडवत
रणांगण पेटवले जातात
खर्यासह खोटे आरोपही
सहजपणे रेटवले जातात

कधी शालीत जोडा ठेऊन
मिश्किल टोला दिला जातो
काळ-वेळ-प्रसंग पाहून
हा हल्लाबोल केला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १८ फेब्रुवारी, २०१७

तडका - शौर्याची ज्योत

शौर्याची ज्योत

स्वराज्याच्या निर्मितीसाठी
झटलात तुम्हीच शिवबा,...
म्हणूनच तर हा महाराष्ट्र
आजही आहे सन्मानाने ऊभा

रयतेचा आदर्श पालनकर्ता म्हणून
तुमच्या कार्यावरती झोत आहे
इतिहासाच्या पाना-पानात तेवती
तुमच्या शौर्याची ती ज्योत आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - राजकीय विरोध

राजकीय विरोध

कधी ऊघड ऊघड तर
कधी मात्र छुपा असतो
राजकारणातील विरोध
कधी काटा कधी छापा असतो

समोर लक्ष देता देता
कधी पाठीत खंजर असतो
समोरच्यापेक्षा कधी कधी
आतला विरोध डेंजर असतो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १७ फेब्रुवारी, २०१७

तडका - संपत्तीचे मार्ग

संपत्तीचे मार्ग

संपत्ती कोणी कमवावी
यावरती कसली गदा नाही
कोणी किती कमवायची
यालाही काही मर्यादा नाही

प्रत्येकालाच स्वातंत्र्य आहे
संपत्तीसाठी कसायला हवे
मात्र संपत्ती कमवण्याचे
मार्ग योग्य असायला हवे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १५ फेब्रुवारी, २०१७

तडका - मताचा स्वाभिमान

मताचा स्वाभिमान

कोणी काहिही म्हटलं तरी
विचारावरती ठाम रहायचं
आपला विकास करण्याला
मतदानाचं काम करायचं

म्हणूनच उमेदवार निवडताना
विचार कधी ना फसला जावा
आपल्या मताचा स्वाभिमान
सदा निस्वार्थपणे दिसला जावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - भाकित

भाकित

कोण काय भाकित करील
याचा काहीच नेम नसतो
कित्तेकांच्या भाकितामध्ये
निव्वळ निव्वळ गेम असतो

भाकित कोणी करायचे
याला काहीही बंधन नसते
म्हणूनच तर हे वारंवार
भाकितांवर भाकित असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १४ फेब्रुवारी, २०१७

तडका - मतदार बंधु भगिणींनो

मतदार बंधु भगिणींनो

ऊगीच द्यायचं म्हणून
आता कुठेही डकवु नका
प्रिय मतदार बंधु भगिणींनो
मत देताना चुकवु नका

लक्षपुर्वक विचार करून
योग्य उमेदवार निवडावा
जेणेकरून आपल्या मताने
आपलाच विकास ना अडवावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १२ फेब्रुवारी, २०१७

तडका - निवडणूक फॅक्ट

निवडणूक फॅक्ट

दांडा तोच तो असला तरी
झेंडा बदलीचा झोळ असतो
पण कधी झेंडा बदलेल
कार्येकर्त्यांनाही मेळ नसतो

नेते पक्ष बदलतील तसे
कार्येकर्ते झेंडेही बदलतात
झेंडा बदलता तोंडातुन
घोषणी बोंडेही बदलतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ११ फेब्रुवारी, २०१७

तडका - प्रचार इफेक्ट

प्रचार इफेक्ट

मतदान खेचण्यासाठी
मोठा आटा-पिटा असतो
लोकांच्या मनात बसण्या
प्रचाराचाच वाटा असतो

म्हणूनच तर हा प्रचारही
जीव ओतुन केला जातो
अन् प्रचाराचा इफेक्टही
निकालातुन आला जातो

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १० फेब्रुवारी, २०१७

तडका - आपले मत

आपले मत

प्रचाराच्या गाडीतुन
आता आग्रह होऊ लागले
अनमोल मत मलाच द्या
सुर कानी येऊ लागले

मात्र कुणाच्या भुलथापांनी
भरकटत ना गेले पाहिजे
आपले मत विचारपुर्वक
विकासालाच गेले पाहिजे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ९ फेब्रुवारी, २०१७

तडका - काळजी घ्या

काळजी घ्या

सहज तोडता येतो म्हणून
आकलेचा तारा तोडू नये
जोडायचा म्हणून ऊगीच
काहिही संबंध जोडू नये

आपलं बोलणं म्हणजे कधीच
तो बाताड्या तुण-तुना नसावा
आपल्या प्रत्येक बोलण्याला
प्रबळ वास्तवी कणा असावा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, ८ फेब्रुवारी, २०१७

तडका - मतदारांनो

मतदारांनो

ना जमतय ना रमतय
नुसतीच काहिली आहे
सत्ते साठीची तगमग
आम्हिही पाहिली आहे

म्हणूनच हे सांगणं आहे
भुलथापांना ग्रासु नका
अन् मतदान करताना
मतदारांनो फसु नका,...

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ६ फेब्रुवारी, २०१७

तडका - मतदान

मतदान

मतदान लोकशाहीची ताकत
हि कवडीमोल विकु नका
आपला स्वाभिमान सोडुन
अमिशां पुढती झुकु नका

आपला हक्क न विकण्याचा
विचार ना फुटायला हवा
आपण केलेल्या मतदानाचा
अभिमानच वाटायला हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ५ फेब्रुवारी, २०१७

तडका - धक्का प्रसंग

धक्का प्रसंग

कितीही जवळचे दिसले तरी
कुणीच कुणाचे पक्के नसतात
कधी यांना तर कधी त्यांना
निवडणूकीय धक्के असतात

विश्वासु वाटणारे माणसंही
अवचितपणे सोडून जातात
तेव्हा तेव्हा राजकारणात हे
धक्का प्रसंग घडुन येतात,...!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ४ फेब्रुवारी, २०१७

तडका - नाराजांची मनधरणी

नाराजांची मनधरणी

कधी जाहिर बाहेर येतात तर
कधी मनातच गुदमरले जातात
मात्र प्रत्येकच मनात हमखास
नाराजीचे सुर हे भरले जातात

नाराज होण्याचे मोसम हल्ली
इलेक्शन पाहून हेरले जातात
नाराजांची नाराजी घालवण्या
स्वार्थाचे गाजरं वापरले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, २ फेब्रुवारी, २०१७

तडका - पक्ष सोडण्यास कारण की

पक्ष सोडण्यास कारण की

जिकडे डाळ दिसेल तिकडे
हल्ली पोळ्या जाऊ लागल्या
अन् आयारामांच्या टोळ्यांसह
गयाराम टोळ्या होऊ लागल्या

स्वार्थाविना राजकारणास
त्यांचे मनही संमत नाही,.?
पक्ष सोडण्यास कारण की
तुमचे आमचे जमत नाही,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - अर्थ संकल्प

अर्थ संकल्प

भविष्यातील हेरणी करून
वर्तमानात आखणी असते
तर कधी कधी चुकांचीही
सविस्तर झाकणी असते

विरोधी धर्म निभावताना
विरोधकही भांडत असतात
या सर्व बाबींचा विचार करून
हे अर्थसंकल्प मांडत असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १ फेब्रुवारी, २०१७

तडका - नेतृत्वाची बढाई

नेतृत्वाची बढाई

प्रत्येकालाच वाटतं की
आपण नेतृत्व करायला हवं
लोकांनी चालावं मागं मागं
आपण पुढे चलायला हवं

नेतृत्वासाठी कधी बाहेरच्यांत
कधी आपसातच लढाई असते
ज्याच्या-त्याच्या बोलण्यामध्ये
स्वनेतृत्वाचीच बढाई असते,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३