धक्का प्रसंग
कितीही जवळचे दिसले तरी
कुणीच कुणाचे पक्के नसतात
कधी यांना तर कधी त्यांना
निवडणूकीय धक्के असतात
विश्वासु वाटणारे माणसंही
अवचितपणे सोडून जातात
तेव्हा तेव्हा राजकारणात हे
धक्का प्रसंग घडुन येतात,...!
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा