चढता पारा
कितीही मनाला आवरलं तरी
खटकणार्या गोष्टी खटकतात
कितीही नको नको म्हटलं तरी
नैसर्गिक बदल हे सरपटतात
जीवाला घातक वाटेल असा
ऊन्हाचा जोर वाढू लागलाय
अन् वातावरणातील गरमीसह
डोक्याचा पाराही चढू लागलाय
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा