उपेक्षितांचा थर्टी फर्स्ट
कवी :- विशाल मस्के
मो.नं. :- 9730573783
त्या बदलत्या क्षणांचे,साक्षीदार होऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| धृ ||
त्या रंगीन दूनियेत
चल प्रकाशात लख्ख
मिळेल तो आनंद
वाटेल थोडं दू:ख
आपल्या जगण्यावरती दू:खी नको होऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| १ ||
तुझ्या-माझ्या जगण्याला
दारिद्रयानं घेरलंय
आपलं बालपणही सारं
मायेविना सरलंय
त्यांच्या आनंदाची मजा डोळेभरून घेऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| २ ||
ते आतिशबाजी रंग
झाले आकाशात दंग
जागतीया आज
रात चांदण्यांच्या संग
फूटत्या फटाक्यांना साद टाळ्यांची देऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| ३ ||
ऐकू जरा क्षणभर
पार्ट्यांमधले नाचगाणे
दूरून-दूरून पाहू
मध्यरात्रीचे खाणे-पिणे
उन्मादाने टाकलेला,शोधू मिळतो का खाऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| ४ ||
थर्टी फर्स्ट पाहून
आशा मनात दाटल्या
मध्यरात्रीत झाल्या
किती रिकाम्या बाटल्या
रित्या बाटल्या विकण्या,नव सालामध्ये जाऊ
चल ना रे भाऊ,थर्टी फर्स्ट पाहू,...|| ५ ||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा