ये आझादी झूठी है,...?
स्वातंत्र्याकडे पाहण्याच्याही
वैचारिकता भिन्न-भिन्न आहेत
स्वातंत्र्यात जगत असलो तरी
स्वतंत्र्यावरच प्रश्नचिन्ह आहेत
आधी बाहेरच्यांनी देश लुटला
आता म्हणे आपलेच लुटत आहेत
स्वातंत्र्यात जगुनही गरिब,कष्टकरी
पारतंत्र्यापरि फरफटत आहेत,...?
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा