पुरस्कार,..
पुरस्कारांच्या वाटा-घाटीला
भुतकाळाचाही वास असतो
कित्तेक-कित्तेक पुरस्कारांना
पारदर्शकतेचा भास असतो
मात्र पुरस्काराचा वाद घडणे हा
पुस्काराचाही अवमान असतो
प्रत्येक व्यक्तीच्या योग्यतेचा
समाज हाच परिमान असतो
त्यामुळेच पुरस्कार देताना
योग्य व्यक्तीलाच दिले पाहिजेत
त्यांच्या सन्मानाचे स्वागत
जनतेकडूनही झाले पाहिजेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा