हा ब्लॉग शोधा

रविवार, ३ मे, २०१५

गंमत हास्य दिनाची,...

गंमत हास्य दिनाची,...

तीला म्हटलं हसून घे
आज हास्य दिन आहे
एक दिवस हसण्याचाही
सांग तुला का शीन आहे

तीनं माझ्याकडं पाहीलं
चेहरा थोडा गंभीर केला
तीच्या या गंभीर वर्तनाला
मी माझाच मला धीर दिला

मी प्रयत्न केला तरीही
ती मात्र हसली नाही
तीच्या स्वभावाशी ती
जराशीही फसली नाही

तीचा चेहरा पाहून मात्र
मी गप-गुमान बसलो होतो
तीला हसवण्याच्या नादात
मीच आज फसलो होतो

मात्र तीला पाहून मीही
आता पुरता गंभीर झालो
आता मीही हसणार नाही
या मतावर खंबीर झालो

माझी झालेली फसगत
आता मला दिसु लागली
मात्र माझा चेहरा पाहून
ती जोरजोरात हसु लागली

नक्की कळेनासं झालं मला
की कुणी कुणाला फसवलं
मी टाकलेल्या जाळ्यामध्ये
आज तीनंच मला हसवलं

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

कविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये,.

( सदर कविता ऑडीओ स्वरूपात मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783 )

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा