हा ब्लॉग शोधा

शनिवार, २ मे, २०१५

तडका - संवाद गायी-बाईचा

संवाद गायी-बाईचा,...!

एकदा गायी म्हणाली बाईला
माझ्यापोटी ३३ कोटी देव आहेत
जिथं तुला किंमतच नाही तिथेही
आम्हा गायींच्या उठाठेव आहेत

मग बाई पण म्हणाली गायीला
हा माझ्या नशिबाचा दोष नाही
पण माणसांच्याच कुकर्माचा
इथे माणसांनाच होश नाही

आज जे तुला किंमत देतात
त्यांनीही मोठा जुल्म केलाय
विसरले आहेत की त्यांनाही
एका बाईनंच जन्म दिलाय

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा