मी शेतकरीच बोलतो आहे,...
तुम्हा सर्वांना आपुलकीनं सांगतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||धृ||
आजवर खुप भोगलं आहे
अजुनही खुप भोगतो आहे
जीवनावरती कर्ज काढून
जीवन आज जगतो आहे
आजही जगण्यासाठी धडपडतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,...||१||
दूष्काळानं होरपळलं आहे
अवकाळही छळतो आहे
आता निसर्गही आमच्या
जगण्याशीच खेळतो आहे
तरीही जगण्याला उमेदीनं पेलतो आहे
होय, मी शेतकरीच बोलतो आहे,...||२||
दुष्काळात अन् अवकाळात
कित्तेकजण दौरे करून गेले
कुणी सांत्वन करून गेले तर
कुणी-कुणी फक्त फिरून गेले
कुणी अजुनही कागदोपत्री फिरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||३||
शेतकर्यांच्या आत्महत्तेचे
इथे अभुतपुर्व तांडव होते
ते दूसरे-तिसरे कुणी नाही
तुमचे-आमचेच बांधव होते
त्यांच्यासाठी आजही जीव तळमळतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||४||
मात्र शेतकर्याच्या मदतीचे
आजही प्रश्न प्रलंबित आहेत
अन् सरकारी धोरणांमुळे
भावनाच आचंबित आहेत
मात्र मदतीसाठी,शेतकरी ना मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||५||
आत्महत्त्याग्रस्तांच्या आकड्यांतही
इथे भ्रष्टाचार घडतो आहे
अन् मृत्युच्या कारणांच्या
लिखावटीचा प्रश्न पडतो आहे
मृत्युच्या कारणांचे कुणी लेखी पुरावे मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||६||
तुम्हाला काय सांगु आमचे
जगणे कीती जर्जर आहेत
कसे लिहीणार मृत्युची कारणे
आम्ही आजही निरक्षर आहेत
कुणी गजेंद्रसिंह कारणे लिहून मरतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||७||
पण आता मृत्युचे कारणे
आम्ही लिहून ठेवणार नाहीत
अन् आत्महत्याग्रस्त म्हणून
शेतकरीही मरणार नाहीत
पण जगण्यासाठी मदतीचा हात मागतो आहे
होय,मी शेतकरीच बोलतो आहे,... ||८||
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
( कविता जरूर शेअर करा परंतु कवितेखालुन नाव काढू नये )
वास्तवदर्शी व ह्रदयाला भिडणारी कविता
उत्तर द्याहटवा