हा ब्लॉग शोधा

शनिवार, ४ एप्रिल, २०१५

तडका - धुसफूसीची कुजबुज

धुसफूसीची कुजबुज

कितीही नाही म्हटले तरीही
मनी मतभेद स्पर्शले जातात
कुणाची धुसफूस होताच
लक्ष सर्वांचे आकर्षले जातात

प्रत्येक धुसफूसीची कुजबुज
जणू सांकेतिक बरबादी असते
तर कुणाची अंतर्गत धुसफूस
बाह्यजनांची लक्षवेधी असते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा