हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १९ मार्च, २०१५

काका

काका,...

काका तुम्ही सोडून गेलात
याला मन संमत नाही
अन् श्रध्दांजली देण्याची
आमच्यामध्ये हिंमत नाही

गहिवरलं काळीज जरी
धरणी स्थिर राहिली नाही
आभाळाची भकास काया
अशी कधीच पाहिली नाही

कानात गुंजतो अजुनही
काका तुमचा आवाज
कसा विश्वास ठेवावा की
तुम्ही नाहित इथे आज

तुमच्या विचारानं विचार
समाजाचे बदलत आहेत
तुमचे उपदेशात्मक बोल
कानावरती आदळत आहेत

तुमचं हूबेहूब चित्रही
डोळ्यांपूढं साकारतं आहे
काका तुमच्या जाण्याला
मन आज नाकारतं आहे

तुमची वैचारिक क्रांती
मना-मनात रुजली आहे
सुरू राहिल ही चळवळ मात्र
मशाल आज विझली आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा