हा ब्लॉग शोधा

गुरुवार, १३ एप्रिल, २०१७

देण बाबासाहेबांची

देण बाबासाहेबांची

                         कवी :- विशाल मस्के,सौताडा.
                         व्हाटस्अप :- 9730573783

जगाला दिपवते आहे,प्रगल्भता विचारांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

भारतीय लोकशाही
जगभरात ग्रेट आहे
आदर्श राष्ट्रनिर्मिती
हि भिमाची भेट आहे

आज राज्यघटने मुळेच,सुखी काया लोकांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

समता,न्याय,हक्क
निर्विवाद भेटत आहे
बंधुता आणि एकात्मता
मना-मनाला पटत आहे

ओतप्रोत भरली आहेत,ती मुल्ये मानवतेची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

सामाजिक बांधिलकीने
समाजही वागतो आहे
हक्क आणि स्वातंत्र्य
अधिकाराने भोगतो आहे

ना कमतरता कसली,मुलभुत अधिकारांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

ना ठेवला तो थारा कुठे
जाती-धर्मांच्या गर्दाडांना
राष्ट्रीयताच आहे जात-धर्म
कधी कळणार हे मुर्दाडांना

प्रवाहात घेण्यासाठी,केली सोय उपेक्षितांची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

आपसातील सोडून द्वेश
एकमेकांचे बंधु व्हा रे
संविधानिक तत्वांनुसार
चला आनंदाने नांदु सारे

तरच लोकशाहीची,सदा ऊंचच राहिल ऊंची
प्रजासत्ताक भारत ही,देण बाबासाहेबांची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9760573783

-------------------------------------

* कविता नावासह शेअर करण्यासाठी परवानगी

* सदरील कविता पाहण्यासाठी समोरील लिंक वर क्लिक करा https://youtu.be/Q0z9McmA8bg

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा