हा ब्लॉग शोधा

बुधवार, ५ एप्रिल, २०१७

प्रेमाची निशाणी

प्रेमाची निशाणी

                 कवी :- विशाल मस्के,सौताडा.
                 व्हाटस्अप:- 9730573783

तापमानाचा पारा सखे
वरवर लागलाय चढायला
धरले डोईवर हात तुझ्या
हि सावली घे तु दडायला

इवल्या इवल्या हातांची ही
सावली तुजला पुरणार नाही
पण हातांच्या या छायेने ऊन
डोईवरती तुझ्या सरणार नाही

ऊन्हाची एकेक तप्त झळाळी
जणू ह्रदयावर वार करते आहे
वसंताने बहरलेली सुंदर काया
मनाने तीळ-तीळ जळते आहे

या ऊन्हात तुजला पाहून सखे
जीवाची झालीय लाही-लाही
का वेळ आली तुजवरती ही
खटकतंय मनात काही-काही

वाढलेल्या तापमानाचा रोष
मानवां वरतीच येतोय सारा
मानवांनीच केली वृक्ष कत्तल
टोचतोय मनाला हा तप्त वारा

मानव चुकीचा पुतळा असेलही
पण आता चुकांनाही सुधरायचं
सुधारल्या आपणच आपल्या चुका
तर बंद होईल जगणंही हादरायचं

येईल तापमानही आटोक्यात
मिळेल सर्वांनाच शितल छाया
वृक्ष-वेली फूलतील फुला-फळांनी
सृष्टीचीही दिसेल खुलुन काया

निसर्ग सुरक्षित तर जिवन सुरक्षित
सखे हि गोष्ट मना-मनात भरायची
आपल्या प्रेमाची निशाणी म्हणून
चल आता वृक्ष लागवड करायची

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9730573783

* सदरील कविता नावासह शेअर करण्यासाठी परवानगी

* कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

* कविता पाहण्यासाठी you tube लिंक :- https://youtu.be/OfpQ0boQofA

* चालु घडामोडींवर आधारित वात्रटिका वाचण्यासाठी ब्लॉग वर भेट द्या www.vishalmske.blogspot.in

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा