थर्टी फर्स्ट
जे आलं, ते जाणार
हे पक्क स्पष्ट आहे
याचा विसर नको की
आज थर्टी फर्स्ट आहे
नव्याचं होईल स्वागत
जुण्याचे मानावे आभार
वाइट क्षण सोडून द्यावे
चांगले घ्यावेत साभार
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
थर्टी फर्स्ट
जे आलं, ते जाणार
हे पक्क स्पष्ट आहे
याचा विसर नको की
आज थर्टी फर्स्ट आहे
नव्याचं होईल स्वागत
जुण्याचे मानावे आभार
वाइट क्षण सोडून द्यावे
चांगले घ्यावेत साभार
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
इज्जत विशेष
इज्जत असेल तर
जपायला बरं वाटतं
इज्जतीत बोललेलं
इतरांनाही खरं वाटतं
म्हणूनच इज्जत जपणे
निर्विवाद पटले पाहिजे
अन् स्वआदराचे श्रेयही
मनाला भेटले पाहिजे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
युतीची गती
कुणाला वाटते नको नको
कुणाला वाटते हवी आहे
युतीसाठीची ही घालमेल
राजकारणात ना नवी आहे
अहो प्रत्येक पंचवार्षिकला
हे महानाट्य उघड असते
सत्तेच्या गाजरासाठी जणू
नको त्याला धरसोड असते
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
जात
कुणासाठी प्रीत आहे
कुणासाठी जीत आहे
माणसांमधली जात ही
कुणासाठी वीट आहे
उमलत्या वक्तीमत्वांचाही
कधी कधी ही घात आहे
अन् कित्तेक प्रेमांचा मर्डरर
माणसांमधली ही जात आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
थंडीतील गस्त
गार गार वातावरण
रोज-रोज होऊ लागले
घराबाहेर पडण्याही
लोक आता भिऊ लागले
गुलाबी थंडीच्या आशा
पुर्णपणे उसावल्या आहेत
सांज-सकाळच्या गस्तही
जणू लोप पावल्या आहेत
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कांदा
झिजवुन झिजवुन मन
याला मायेनं जपलं होतं
आमच्या सुखाचं स्वप्नही
याच्यातच तर लपलं होतं
पण याला भाव देताना
सरकारी इरादा गंदा आहे
म्हणूनच तर आज बाजारी
कवडीमोल हा कांदा आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
घरचा बहिष्कार
जमत जरी नसलं तरी
जमवुन घेतलं जातं
नाक-डोळे मोडले तरी
कमवुन घेतलं जातं
सत्तेचं गाजर दिसताच
मैत्रीचा अविष्कार असतो
पण मनात मात्र सदैवच
घरचा बहिष्कार असतो
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३