हा ब्लॉग शोधा

बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

तडका - युतीची गती

युतीची गती

कुणाला वाटते नको नको
कुणाला वाटते हवी आहे
युतीसाठीची ही घालमेल
राजकारणात ना नवी आहे

अहो प्रत्येक पंचवार्षिकला
हे महानाट्य उघड असते
सत्तेच्या गाजरासाठी जणू
नको त्याला धरसोड असते

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा