हा ब्लॉग शोधा

सोमवार, ५ डिसेंबर, २०१६

हे ज्ञानसूर्य भिमराया

हे ज्ञानसूर्य भिमराया

तुमच्या प्रतिभेचा दिव्यपणा
मना-मनाला कळतो आहे
तुमच्या ज्ञानाचा प्रकाशझोत
जगभरातही दरवळतो आहे

जो-तो आता झूकतो आहे
तुमचे विचार शिकतो आहे
तुम्ही दिलेल्या तत्वांमुळे
समाजातही या टिकतो आहे

राष्ट्रीय बांधिलकी जोपासत
माणूस माणसाला प्रिय झालाय
जाती-धर्माला न देता थारा
तुमचा समाज भारतीय झालाय

भारत एकसंध नांदतो आहे
हि तुमचीच अमुल्य भेट आहे
तुम्ही केलेली ही राष्ट्र निर्मिती
आजही जगभरात ग्रेट आहे

कर्तृत्वाच्या जोरावरती
सामान्य सत्ताधारी झाले आहेत
तर सत्तेत उन्माद करणारेही
घटनेने पायऊतार केले आहेत

तुमच्या राज्य घटनेमुळेच
हि एकात्मता टिकलेली आहे
तुम्ही दिलेली ही लोकशाही
जगभरातही जिकलेली आहे

आयडॉल ऑफ नॉलेज म्हणून
जगभरात तुमचाच अदर्श आहे
तुमचा जगभरातील गौरव पाहून
आमच्या मनाला हर्ष आहे

तुमच्या मुळेच जगात श्रेष्ठ
या देशालाही स्थान आहे
हे ज्ञानसूर्य भिमराया
तुम्हा मानाचा हा प्रणाम आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो. 9760573783

-------------------------------

* कविता नावासह शेअर करण्यास परवानगी

* सदर कवितेचा व्हिडीओ पाहण्यासाठी लिंक :- https://youtu.be/MLHTlH9KESA

* चालु घडामोडीवर आधारित डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा