"टीईटी"चा पेपर
"टीईटी"चा पेपर म्हणे
भलते चाळे करू लागला
वेळेआधीच दिमाखात
बेडरपणे फिरू लागला
व्हाटस्अपची ओढ बघा
पेपरलाही लागली आहे
पेपर फूटीने परिक्षेची
जणू प्रतिमा डागली आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
"टीईटी"चा पेपर
"टीईटी"चा पेपर म्हणे
भलते चाळे करू लागला
वेळेआधीच दिमाखात
बेडरपणे फिरू लागला
व्हाटस्अपची ओढ बघा
पेपरलाही लागली आहे
पेपर फूटीने परिक्षेची
जणू प्रतिमा डागली आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
मनाची काया
एकदा लत लागली की
म्हणे सुटता सुटत नाही
पण सवय न सुटणं हे
आमच्या मनी पटत नाही
इच्छा असेल तर सवय
सोडवली जाऊ शकते
अन् मनाची काया ही
घडवली जाऊ शकते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
पद-प्रतिष्ठेच्या भुका
पक्षांतर्गत हेवे-देवे
वरपर्यंत पोचले आहेत
वरच्यांनी खाली येऊन
कान सुध्दा खेचले आहेत
तिळ-गुळ वाटून,खाऊन
प्रेमा-प्रेमाने रमतील का,.?
पद-प्रतिष्ठेच्या भुका त्यांच्या
तिळ-गुळाने शमतील का,..?
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
तिळ-गुळ देता-घेताना
तिळ-गुळ देता-घेताना
बोलतात सारेच गोड
तरी मात्र जात नाही
इथे माणसांची खोड
पण रूसव्या-फूगव्यांचा
ना ऊगीच घोळ असावा
हातामध्ये तीळ आणि
मनामध्ये पीळ नसावा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
ब्रीद संक्रातीचे
मनातील द्वेश
पटकन सोडवा
गुळाचा गोडवा
मनात वाढवा
कपटी पणाचा
विसरून झोला
तिळ-गुळ घ्या
गोड-गोड बोला
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सणांचे डिजीटायझेशन
मोबाईल टू मोबाईल
घेता येतो-देता येतो
संक्रातीचा तिळ-गूळ
मनभरून पाहता येतो
रिती परंपरा वरतीही
आधुनिकतेचे जाळे आहेत
अन् सण-वारही हल्ली
जणू डिजीटल झाले आहेत
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
बत्ती नैतिकतेची
रस्ता मोकळा असतानाही
ऊगीच जातात कुपाट्यात
आगीमधून ऊठून कधी
स्वत: पडतात फूपाट्यात
कित्तेक मनात वाढलेली
अशी मानवी वृत्ती असते
मना-मनातुन विझलेली
नैतिकतेची बत्ती असते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३