हा ब्लॉग शोधा

ग्रहण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
ग्रहण लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, २१ जून, २०२०

तडका - ग्रहण

ग्रहण

ग्रहण आणि सुतक यांचे
अगदी जुने नाते आहेत
कुणी म्हणतात खरे तर
कुणी म्हणतात हे खोटे आहेत

नाते खरे वा खोटे असो
ग्रहण मात्र गाजले जाते
कुठे पाळतात सुतकही
कुठे मात्र हे पुजले जाते

ग्रहण म्हणजे नैसर्गिकता
मना-मनात पटवले जावे
अफवा आणि अंधश्रध्दांना
समाजातूनच हटवले जावे

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३