पावसाळी प्रेम
तो दिसत नव्हता तर
ती पुरती बैचेन होती
तीच्यासाठी तो म्हणजे
अगदी दैवी देण होती
तीची आणि त्याची जोडी
उत्तुंग प्रेमाचं प्रतिक आहे
नातं तानलं तरी तोडू नये
हि त्यांचीच तर शिक आहे
तीची व्याकुळता पाहुन
तो आज तिच्या चरणी आहे
तो म्हणजे मेघराजा आणि
ती म्हणजे ही धरणी आहे
अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा