अनलॉक 2.0
कोरोना म्हणजे कर्दनकाळ
हे जगजाहिर झालेले आहे
म्हणूनच जगभर कोरोनाला
विशेष महत्त्वही दिलेले आहे
स्वत:चाच करावा घात
हे जनतेलाही पटत नाही
पण कितीही पाळा बंद
गरजा, कर्तव्य सुटत नाही
अनलॉकच्या सवलती घेताना
जनता जपुनच वागली आहे
उत्सुकता अनलॉक 2.0 ची
आता जनतेलाही लागली आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::::
युट्युब लिंक :- https://youtu.be/3yuNwf9j_Rg
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा