ऑनलाइन एज्युकेशन
अहो शिक्षणाचे धडे आता
ऑनलाइन फेकु लागतील
मग घरात बसल्या बसल्या
विद्यार्थीही शिकु लागतील
या डिजिटल प्रणालीमुळे
शिक्षण नक्कीच स्मार्ट होईल
शिक्षण देणे आणि घेणेही
एक ऑनलाइन आर्ट होईल
पण या ऑनलाइन शिक्षणापासून
गोर-गरिबं ना हिरावली जावी
विद्यार्थी ऑनलाइन येण्यासाठी
साधन सामग्रीही पुरवली जावी,.!
अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा