बेत
आकाशातील काळे ढग
रोज-रोज हेरले जातील
शेतकर्यांचे स्वप्न देखील
मातीमध्ये पुरले जातील
शेतातील पिकांसह स्वप्नही
नव अंकुर घेऊन वर येतील
कर्ज फेडण्याच्या आशाही
मग नव-नविन जोर धरतील
निसर्गाने दिली साथ तरच
सुखावतील सारे शेतकरी
हिच अपेक्षा घेऊन मन
मनातल्या मनात बेत करी
अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा