हा ब्लॉग शोधा

बेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
बेत लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १८ जून, २०२०

तडका - बेत

बेत

आकाशातील काळे ढग
रोज-रोज हेरले जातील
शेतकर्यांचे स्वप्न देखील
मातीमध्ये पुरले जातील

शेतातील पिकांसह स्वप्नही
नव अंकुर घेऊन वर येतील
कर्ज फेडण्याच्या आशाही
मग नव-नविन जोर धरतील

निसर्गाने दिली साथ तरच
सुखावतील  सारे शेतकरी
हिच अपेक्षा घेऊन मन
मनातल्या मनात बेत करी

अँड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड. 
मो. ९७३०५७३७८३