हा ब्लॉग शोधा

झटपट सावरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
झटपट सावरा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

तडका - झटपट सावरा

झटपट सावरा

अहो झटपट झटपट पैसा
कुणाला कमवावा वाटतो
झटपट झटपट पैशासाठी
भोंदुपणाही जमवावा वाटतो

म्हणूनच भोंदु महाराजांची
इथे संख्या वाढलेली आहे
अन् एका-एकाची पीढीही
भोंदू बुवांनी गाढलेली आहे

म्हणूनच तर गरज आहे
समाजाने जागृत होण्याची
तरच भितीही टळेल खरी
हा समाज विकृत होण्याची

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३