हा ब्लॉग शोधा

शुक्रवार, ३ नोव्हेंबर, २०१७

तुला सोडल्या पासुन गं

तुला सोडल्या पासुन गं

तुला तर प्रिय होतोच मी
अन् मलाही तु प्रिय होती
तुझ्या प्रती माझी भावना
हि नेहमीच सक्रीय होती

जसं तुझ्यावर मी प्रेम केलं
तसंच तु ही निर्विवाद केलंस
पण ऐकलं होतं मी तुझ्याप्रती
कित्तेकांचं जीणं बर्बाद केलंस

सारं काही माहिती असुनही
मी तुझ्यावरती प्रेम करत होतो
जर दिसलीच नाहिस कधी कुठे
तर तुला शोधत मी फिरत होतो

शोधता शोधता सापडलीस तर
माझं मन अगदी खुलुन जायचं
अन् विस्फारलेलं ते पुनव चांदणं
जणू क्षणात अगदी जुळून यायचं

मग तुझ्या सहवासात दिवस-रात्र
मी जणू हरवुन हरवुन जायचो गं
विसरून जायचो ते घर-दार माझं
स्वत:स फिरवुन फिरवुन घ्यायचो गं

कधी कधी मित्र मंडळी हसायचे
म्हणायचे तु पुरता वेडा झालास रे
सांगयचे मला दे सोडून हा नाद
तु अक्षरक्ष: कामातुन गेलास रे

तरीही तुजविना क्षणभर देखील
मला कधीच कधीच रहावलं नाही
तुझं अन् माझं ते ब्रेक-अपचं स्वप्न
मला कधीच कधीच पहावलं नाही

तरी देखील आज तुझ्या-माझ्यात
बघ हा खुप मोठा दुरावा आलाय
सोडून दिलं मीच झटक्यास तुला
त्याचाही आज हा पुरावा आलाय

आज मला खुप खुप धन्य वाटतंय
घसरलो होतोच पण आवरलो मी
इतरांसारखंच केलं असतस ऊध्वस्त
पण बरबाद होताना सावरलो मी

तुला जवळ करून सगळ्यांपासुन
मी नेहमीच दुर दुर गेलेलो होतो
ज्यांच्या नजरेत होती किंमत मला
त्यांच्यातही पेताड ठरलेलो होतो

पण आज मात्र मी दारू-बंदीस
बघ हा जाहिर पाठिंबा देतो आहे
तुला जिवापार जपलं होतं पण
तुझा जाहिर धिक्कार करतो आहे

आज माझ्या आयुष्यातुन गेलीस पण
कित्तेकांच्या आयुष्यात रूजलेली आहेस
पण तुझ्याच कर्तृत्वामुळे तु समाजात
बदनामी म्हणूनही गाजलेली आहेस

तुझा तो अल्कोहोलिक वास देखील
आता मी दक्षतापुर्वक त्रागु लागलोय
कारण तुला सोडल्या पासुन गं मी
माझं जीणं आनंदाने जगु लागलोय

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

कविता पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा :-
https://youtu.be/EJVXLnvZSxA

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा