हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ९ ऑक्टोबर, २०१८

तडका - प्रेमळ बोलणे

प्रेमळ बोलणे

प्रेमाची भाषा हल्ली
झपाट्याने बदलत आहे
सोनु,बाबु अन् पिल्लुही
प्रेमामध्ये ओघळत आहे

लाडामध्ये येऊन पहा
प्रेमाचे हे बोलणे आहेत
नव-उदयास आलेली ही
संवादाचे दालने आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २९ सप्टेंबर, २०१८

तडका - महा घोटाळा

महा घोटाळा

कित्तेकांनी दिलेत शब्द
कुणी अजुनही देत आहेत
पण राजकारणी शब्द सांगा
नक्की कुठे खरे होत आहेत

टिका-टिपण्ण्या भुलथापा
हि राजकारणी तहान आहे
पण जनतेची दिशाभुल
हा घोटाळा ना लहान आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २४ सप्टेंबर, २०१८

तडका - दैनिक जगणं

दैनिक जगणं

कालचा काळ जुना
आज नवा दिवस आहे
ऊद्याच्या दिवसासाठी
नव्या-नव्याने नवस आहे

हिच रीत रोज घडते
याला कुठे आवर आहे,.!
इथे तर तोच खुश आहे
ज्याच्याकडे पावर आहे,.

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, २३ सप्टेंबर, २०१८

तडका - मतदान पध्दत

मतदान पध्दत

कुठलंही दाबा बटन तुम्ही
जाईल मत विशिष्ट पार्टीला
वेग-वेगळ्या ठिकाणी देखील
हल्ली हा विषय आहे चर्चिला

मतदारांसाठीही मनापासुन
आहे बॅलेट पेपर आकर्षक
कारण लोकशाही जगवण्या
मतदान असावेत पारदर्शक

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, २२ सप्टेंबर, २०१८

छवी

कविता :- *छवी*

कवी :- *विशाल मस्के*
            सौताडा, पाटोदा, बीड.
            मो. 9730573783

*कवितेची लिंक* :- https://youtu.be/CW9IHq9JK08

बुधवार, १९ सप्टेंबर, २०१८

तडका - अत्याचार महाकलंक

अत्याचार महाकलंक

रोज नविन बातमी
आता कानी येत आहे
रोज कुठे ना कूठे
अत्याचार होत आहे

अत्याचाराच्या संख्येत
रोज होणारी वाढ आहेत
अल्पवयीन बालकांचीही
नराधमांस ना चाढ आहे

समाजातील हे प्रकार
तत्परतेने रोखले पाहिजेत
नराधमी अन् अत्याचारी
दिवसा-ढवळ्या ठोकले पाहिजेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १८ सप्टेंबर, २०१८

तडका - मोबाईल

मोबाईल

माणसांच्या गर्दीत कठीण
हवा तोच माणुस शोधनं
अन् हवं तेव्हा भेट घेऊन
त्याच्याशी तत्पर संवाद साधनं

पण याला दुजोरा देखील
तंत्रज्ञानाने दिलेला आहे
माणसांचा पी.ए. म्हणूनच
मदतीला मोबाईल आलेला आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३