अत्याचार महाकलंक
रोज नविन बातमी
आता कानी येत आहे
रोज कुठे ना कूठे
अत्याचार होत आहे
अत्याचाराच्या संख्येत
रोज होणारी वाढ आहेत
अल्पवयीन बालकांचीही
नराधमांस ना चाढ आहे
समाजातील हे प्रकार
तत्परतेने रोखले पाहिजेत
नराधमी अन् अत्याचारी
दिवसा-ढवळ्या ठोकले पाहिजेत
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा