हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ९ ऑगस्ट, २०१६

तडका - बोगस गोरक्षक

बोगस गोरक्षक

स्वत:च्या आकलेला तारे
स्वहाताने सजवु लागले
गोरक्षकाच्या नावाखाली
हे दहशत माजवु लागले

अन्यायकारी प्रवृतींस
समाजातुन थोप हवा
या बोगस गोरक्षकांस
कायद्याचाच चोप हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, ८ ऑगस्ट, २०१६

तडका - भेटीचे गुपित

भेटीचे गुपित

कधी कोण कुठे-कुठे
कुणाची भेट घेतो आहे
हल्ली भेटी गाठी म्हणजे
चर्चेचा विषय होतो आहे

कित्तेकांच्या भेटीचे गुपित
सुरक्षितपणे दडले जातात
मात्र कुणाच्या भेटीचे गुपित
तर्क लावत काढले जातात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - यंत्र

यंत्र

माणसांच्या जागी
राबु लागले यंत्र
यंत्रांना राबवण्या
विकसित झाले तंत्र

नव-नवे विक्रमही
हल्ली यंत्र रचु लागले
माणसांपेक्षा यंत्रांचे
विश्वास इथे पचु लागले

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

रविवार, ७ ऑगस्ट, २०१६

तडका - जन रक्षकांनो

जन रक्षकांनो

विश्वासाच्या फांदीवरती
अविश्वासी झोका नसावा
जनतेच्या रक्षकांकडून
जनतेलाच धोका नसावा

अन्यायकारक वारे
समाजात पसरू नयेत
जनतेच्या रक्षकांनी
स्वकर्तव्य विसरू नयेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पगार वाढ

पगार वाढ

वरवरच फूगतोय
मागण्यांचा बाजार
प्रत्येकाला हवाय
इथे वाढीव पगार

मिळेल तेवढं काढावं
हा त्यांचा ध्यास आहे,.?
कामाचा कंटाळा अन्
दामाचा हव्यास आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शनिवार, ६ ऑगस्ट, २०१६

मैत्री

------(} मैत्री {)------

                   कवी : विशाल मस्के
                             सौताडा, पाटोदा, बीड.
                             मो. 9730573783

मैत्री तर अशीच असते ना
कधीही,कुठेही,काहीही
अगदी हक्कानं बोलणारी
समजुन घेणारी,सांगणारी

आनंद देणारी अन् घेणारी
चुका शोधणारी,सांगणारी
रूसवे फुगवे होऊन देखील
स्तुती करणारी,खेचणारी

मनात कधी न टोचणारी
हेवे-देवे ठेचणारी
एकमेकांच्या मनाच्या
गाभार्यात पोहचणारी

अविश्वासाच्या दरीत
चुकुनही न खचणारी
दुर असुन सुध्दा सदैव
जवळ-जवळ भासणारी

एकांतात असतानाही
आठवणीनं हसवणारी
एकमेकांना आपुलकीनं
सदा आपलंसं करणारी

प्रत्येक-प्रत्येक वादळात
न डगमगता टिकणारी
एकमेकांना साथ देत-देत
जीवनात अविभाज्य होणारी

या सर्वांची प्रचिती तर
मला तुझ्याकडून आलीय
हि मैत्रीच तर असते ना,.?
म्हणूनच मी तुझ्याशी मैत्री केलीय

* विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.9730573783

तडका - महाड दुर्घटना

महाड दुर्घटना
प्रवाहाच्या ओघात
महाडचा आघात
हा चित्त थरारक
नैसर्गिक प्रघात
महाडच्या दुर्घटनेचा
चुरका मनाशी आहे
या नैसर्गिक करणीत
माणुसही दोषी आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३