हा ब्लॉग शोधा

बुधवार, ११ जुलै, २०१८

तडका - एक वास्तव

एक वास्तव

प्रवास आणि खड्ड्यांचं
हे नातं भलतं जुनं आहे
कित्तेक रस्त्या-रस्त्यांवर
खड्ड्यांचंच ठाणं आहे

मुदत संपण्या आधीच कुठे
रस्त्यात खड्डे साकार आहेत
हे उचकटलेले रस्ते म्हणजे
बेइमानीचे शिकार आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, १० जुलै, २०१८

तडका - सुविचार

सुविचार

रोज-रोज वाचले तरीही
रोज अजुन नवे आहेत
वेग-वेगळ्या वेबसाइटवर
सुविचारांचे ठेवे आहेत

सोशियल मिडीया प्रभावी
कॉपी पेस्टच्या संधी आहेत
पण सुविचार वाचुन देखील
इथे वागणे अनागोंदी आहेत ?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, ९ जुलै, २०१८

तडका - पाऊस हाल

पाऊस हाल

मुंबईचा पाऊस बघा
लक्षवेधक ठरू लागला
कोसळता कोसळता
फजितीही करू लागला

आपल्या शहरी रचनेचे
हे आपत्ती फळे आहेत
ठरवू नका कोणीच की
हाल निसर्गामुळे आहेत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, ८ जुलै, २०१८

तडका - पावसाळा

पावसाळा

"येतच नाही येतच नाही"
लोक भलते कष्टी होते
म्हणूनच की काय ही
संततधार अतिवृष्टी होते

अजुन लांबता संततधार
बळही मिळेल नवसाला
मनी आकांक्षा वाढू लागेल
मीटर असावेत पावसाला

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, ७ जुलै, २०१८

तडका - घोटाळे

घोटाळे

दाबले जातात, राबले जातात
कधी ऊत्स्फूर्त काढले जातात
विकासाच्या नावावरती देखील
इथे हे घोटाळे घडले जातात

याला सत्तेचीच गरज नसते
सत्तेविनाही हे होऊ शकतात
दुसर्यांना दगड मारणारेही
काचेच्या घरात राहू शकतात ?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, ६ जुलै, २०१८

तडका - जलदान

जल दान

वाट पाहता पाहता
लोक आतुर होते
पावसाळी दिवस
तरीही फितुर होते

आता येता पाऊस
आनंदी उधाण आहे
या तापलेल्या भुईस
नैसर्गिक जलदान आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ५ जुलै, २०१८

तडका - अफवा एक हत्यार

अफवा एक हत्यार

नुसती अफवाच फिरता
त्यावर संशयही स्वार होतो
अन् संशयापोटी कधी कधी
निरापराधांवरही वार होतो

निरापराधांना शिक्षा नसावी
लाख मोलाचा विचार आहे
अफवाची पडताळणी करा
अफवा घातक हत्यार आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३