हा ब्लॉग शोधा

मंगळवार, ३० जून, २०१५

तडका - अतिशहाणे,...

अतिशहाणे,...

स्वत:ला शहाणा समजल्यास
माणूस अतिशहाणा होतो
अति शहाणपणा दाखवताना
माणूस अतिलहाना होतो

दुसर्‍यांचे शहाणपण पाहताना
त्यांची बुध्दी आखडली जाते
अन् अतिशहाणपणाची री मात्र
इथे वारंवार ओढली जाते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा