हा ब्लॉग शोधा

शनिवार, ३ सप्टेंबर, २०१६

तडका - वर्गणी जमा करताना

वर्गणी जमा करताना

वर्गणी मागत असताना
नैतिकतेचं रूप असावं
जमा झाल्या फंडाला
वर्गणीचंं स्वरूप असावं

धाक दाखवुन दाखवुन
वर्गणी जमा करू नये
जमा केलेली वर्गणी
हि खंडणी ठरू नये

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हल्ल्यांचे सत्य

हल्ल्यांचे सत्य

पोलिसांच्या सुरक्षिततेवर
आता प्रश्नचिन्ह आहेत
घडते अपप्रकार पाहून
आमचे मनं सुन्न आहेत

बारकाईने पाहिल्यास
सत्य स्पष्ट दिसु शकतात
या घडत्या घटनांमागे
षढयंत्रही असु शकतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, २ सप्टेंबर, २०१६

तडका - वार शल्याचे

वार शल्याचे

रागाचा आवंढा गिळून
वाणीत गोडवा भरावा लागतो
गळ्यात-गळे घेतले तरीही
मनात मात्र दुरावा भासतो

व्यक्त करता न येण्याजोगे
मनात भलते राडे असतात
हे शल्याचे वार म्हणजे
शालीमधले जोडे असतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - गृहनिर्माण धोरण

गृहनिर्माण धोरण

संविधान सांगत आहे
प्रत्येकाला मिळावं घर
भारतीय नागरिकांना
स्वघरातुन दिसावी भोर

मात्र हे घर देतानाही
कुठे छुपे कारण असते
वोट बँक पाहूनच
गृहनिर्माण धोरण असते

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, १ सप्टेंबर, २०१६

तडका - संघाचे सत्य

संघाचे सत्य

म्होरक्या योग्य नसेल तर
संघ धोक्यात येऊ शकतो
प्रगती पथावरूनही थेट
अंधकारात जाऊ शकतो

म्हणूनच सामाजिक संघाला
म्होरक्या योग्य मिळायला हवा
सामाजिक एकोप्याचा मार्ग
संघ म्होरक्याला कळायला हवा

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - नराधमांचे इरादे

नराधमांचे इरादे

रोज कुठे ना कुठे
अत्याचार घडताहेत
समाजाच्या चारित्र्यावर
बदनामी धब्बे पडताहेत

समाजातील या नराधमांचे
पडसाद खोलवर आहेत
यांना ना कुठली जात-धर्म
यांचे इरादे हरामखोर आहेत

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३