विषय सिनेमांचे
सिनेमांचे विषय हल्ली
भलते चर्चिले जातात
चर्चेसाठी वेळ आणि
पैसेही खर्चिले जातात
सिनेमांच्या सादरीकरणाने
कित्तेक मनं दुखावतात
तरीही मात्र असे सिनेमे
चलतात म्हणून दाखवतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
विषय सिनेमांचे
सिनेमांचे विषय हल्ली
भलते चर्चिले जातात
चर्चेसाठी वेळ आणि
पैसेही खर्चिले जातात
सिनेमांच्या सादरीकरणाने
कित्तेक मनं दुखावतात
तरीही मात्र असे सिनेमे
चलतात म्हणून दाखवतात
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आपले रस्ते
रस्त्यावरून जाताना
रस्त्यावरून येताना
आपण सर्रास पाहतो
रस्ते खराब होताना
सगळीकडे हिच अवस्था
गाव,शहर आणि वस्त्यांची
आपणच घ्यावी काळजी
आता आपल्या रस्त्यांची
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आपल्या योजना
प्रत्येक योजने मधील
आहेत ठरलेले कडवे
कुणी करतात सक्ती
कुणी लावतात आडवे
कोण राजकारण करते
सामान्यांनाही कळते
जनतेचे हित देखील
या राड्यांनी बारगळते
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सेफ्टी महत्वाची
मोका मिळेल तिथे
सेल्फीचा हट्ट आहे
मनाला बिलगलेलं
हे वेडच घट्ट आहे
डेंजर झोन सेल्फी
ना विरत्वाची आहे
सेल्फी पेक्षा सेफ्टी
ही महत्वाची आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
सहल करताना
जिथे जायला पाहिजे
तिथेच घातले बंधन
शैक्षणिक सहलीत हे
निर्माण केले कोंदण
सहलीत काय करावे हा
सरकारी दबदबा आहे
सहलीतील आनंदावर ही
नियमावलीची गदा आहे
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
आदर्श नौरोतीचा
डिग्री नाही म्हणून
नाही झाली हताश
गावचा विकास हेच
काम घेतलं हातास
आश्रय घेतला विकासात
टेक्नॉलॉजीय पर्वतीचा
भारत महासत्ता करण्या
आदर्श घ्यावा नौरोतीचा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३
बोलावं ते पोहचेल का,...?
बोललो तेच पोहचावं
सर्वांनाच असते अपेक्षा
होतात तरीही वेगळ्या
शब्दा-शब्दांतुन उपेक्षा
शब्दांना समजुनही शस्र
कितीही ते जपुन वापरा
मात्र आपल्या सोयीनेच
काढतो अर्थ ऐकणारा
विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३