----------~!!! ऊमेद !!!~----------
कवी :- विशाल मस्के
मो. 9730573783
आटता आटंना यास,खीळ का बसंना
भरभरूनी वाहतोय,वेदनेचा हा पाझर
काळीजं जाळलं यानं,जगणं छळलं
ऊभ्या आयुष्यास यानं,केलंया बेजार
आयुष्याच्या पटलावर,खेळ हा रांगडा
कशी रीत नियतीची,ही जालीमं जालीमं
ना जगण्यातं रस देते,ना मरण्यातं रस
कसं फासु या नियतीला,काळीमं काळीमं
कसा टाकु कळंना या,नियतीला डाव
कसा देऊ सांगा कुणी, जगण्याला वाव
कधी देते छाव ती,अन् टाकते हो डाव
वेळो वेळी माझ्याच का,नशिबी हा घाव
माझं नशिबं बुडलं,यातनांनी हो पीडलं
उमेदीचं माझ्या का हो,अंकुरं खुडलं
मनी जगण्याची आस,पण मरणाचा भास
जीत्यापनी का हो,माझं मरणं धाडलं
आता केलाया निर्धार,मी मरत जगनं
नियतीच्या डावापुढे,ऊगी ना हरनं
माझ्या नशिबाला मीच,हाताने कोरील
मेलो तरी जगातं या,मरूनं ऊरनं
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783
------------------
* सदरील कविता नावासह शेअर करू शकता
* सदरील कविता ऐकण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
* चालु घडामोडीवर आधारित डेली वात्रटिका मिळविण्यासाठी व्हाटस्अप नंबर :- 9730573783
अधिक वात्रटिका वाचण्यासाठी www.vishalmske.blogspot.in वर भेट द्या
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा