हा ब्लॉग शोधा

सोमवार, १७ सप्टेंबर, २०१८

तडका - इलेक्शन आस-पास

इलेक्शन आस-पास

जुने पंचवार्षिक संपताना
नव्याचा ऊल्हास असतो
उमेदवारी आपल्यालाच
हा कित्तेकांना भास असतो

म्हणूनच तर नव्या जोमात
रोज-रोज फिरणं असतं
इलेक्शन डोळ्यापुढे ठेऊन
मनातल्या मनात झुरणं असतं

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

रविवार, १६ सप्टेंबर, २०१८

तडका - सामाजिक लोड

सामाजिक लोड

जे बोलायचं ते
हे बोलुन घेतात
स्ष्टीकरण देताना
हे पळून जातात

अविचारी व्यक्तींची तर
ही जुनीच खोड आहे
अशा व्यक्तींना पोसणे
हा सामाजिक लोड आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

ऐकण्यासाठी You tube लिंक :- https://youtu.be/De6vDUveB4Y

शुक्रवार, १४ सप्टेंबर, २०१८

तडका - लबाड

लबाड

लबाडाला झाले
इथे लबाड प्रिय
म्हणूनच लबाडी
बघा आहे सक्रीय

समाजात चालते
बहूतांश लबाडी
लबाडांना राहिली
लाज ना थोडी,.?

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, १३ सप्टेंबर, २०१८

तडका - महागाई एक विघ्न

महागाई एक विघ्न

कर वसुली बाबतीत पहा
वेग-वेगळे महा-भाग झाले
कर आकारणीचा परिणाम
गणेशजीही महाग झाले

देवा-धर्माच्या नावाखाली
कोण म्हणतो लुटत नाहीत
मानवी स्वार्थी मनामधुन
इथे देव सुध्दा सुटत नाहीत

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १२ सप्टेंबर, २०१८

तडका - दर विशेष

दर विशेष

पेट्रोल-डिझेल भाव
जरी वाढले आहेत
तरी देखील प्रवास
ना कुणी सोडले आहेत

कारण हा प्रवास जणू
जिवनावश्यक बाब आहे
म्हणूनच तर दर वाढीवर
रोज नव-नवा दाब आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

गुरुवार, ६ सप्टेंबर, २०१८

तडका - वाचाळकी

वाचाळकी

हा विषय आजचा नव्हे
हा तर फार जुना आहे
वाचाळकी आजार नव्हे
हा नालायक पणा आहे

कधी कुठे काय बोलायचे
हि अक्कल असली पाहीजे
नसता वाचाळकी निर्गमणारी
हि पिलावळच नसली पाहिजे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

शनिवार, १ सप्टेंबर, २०१८

तडका - खणखणीत सत्य

खणखणीत सत्य

पैशांचा लालचीपणा
सांगा कुणी सोडलाय
पैशाचा हव्यास इथे
प्रत्येकाला जडलाय

म्हणूनच तर समाजात
बेकायदा कामे होतात
पण सत्य येता समोर
भले-भले रिकामे होतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३