लक्षात ठेवा
दुसर्यांच्याच जीवावर
जीवन जगतात कुणी
संयम ठेवतात कुणी
गुर्मीत वागतात कुणी
इतरांना त्रास देण्याचे
नाहीत कुणाचे परवाने
हमरी-तुमरीवर न येता
आपसात वागावे प्रेमाने
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
लक्षात ठेवा
दुसर्यांच्याच जीवावर
जीवन जगतात कुणी
संयम ठेवतात कुणी
गुर्मीत वागतात कुणी
इतरांना त्रास देण्याचे
नाहीत कुणाचे परवाने
हमरी-तुमरीवर न येता
आपसात वागावे प्रेमाने
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
खुम खुमी
कुणी कुणाला कमी नाही
प्रत्येककाला ज्ञात आहे
तरीही एकमेकांचा
इथे वारंवार घात आहे
"ध" चा "मा" करणारेही
अजुन इथे कमी नाहीत
असे लोक कुठे मिळतील
ज्यांच्यात खुम-खुमी नाहीत
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
व्याप
सरकवल्याने ना सरकतो
ऊरकवल्याने ना ऊरकतो
हा कामाचा व्याप सदा
मागे मागेच फिरकतो
कितीही व्याप ऊरकला तरी
तो नव्या नव्याने वाढत असतो
व्याप ऊरकता ऊरकता मात्र
मानवी जीव तडफडत असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
राजकीय उपमा
कोणाला कधी काय बोलावं
हा त्यांच्या मनाचा खेळ असतो
कुणाचं बोलणं सुटसुटीत
कुणाच्या बोलण्यात घोळ असतो
कधी द्वेशात फरफटतात
कधी विनोदात नटल्या जातात
अशा राजकीय उपमा या
वाटेल तशा वाटल्या जातात
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
डान्स चान्स
नवे नवे नियम
नवे नवे धोरणं
पण याच्यापायी
झाले कुणी चुर्ण
मात्र तिथे जाणाराचा
खरा-खुरा दोष असतो
ते बर्बाद होत नाहीत
ज्यांना तिथेही होश असतो
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
रहा औकातीत
थोडा जोर वाढल्याने
होऊ नये अवलक्षित
पोलिस आहेत म्हणूनच
समाज आहे सुरक्षित
पोलिसांवर हल्ले करणे
हि संस्कृती आपली नाही
भ्रमात राहू नये की त्यांनी
तुमची औकात मापली नाही
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
स्मृती भ्रंश
भिर-भिर,भिर-भिर
फिरू लागला वारा
टप-टप,टप-टप
पडू लागल्या गारा
हल्ली निसर्गात नविनच
अवकाळाचा अंश आला
निसर्ग विसरला मोसमही
त्याला स्मृतीभ्रंश झाला
विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३