हा ब्लॉग शोधा

शनिवार, १३ जून, २०१५

तडका - अन्नाची सुरक्षितता,...?

अन्नाची सुरक्षितता,...?

आहाराच्या असुरक्षिततेच्या
ऊसळ्यांवरती ऊसळी आहेत
माणसांसाठीच्या अन्नामध्ये
माणसांकडूनच भेसळी आहेत

जणू मना-मनात पोसलेले
निष्काळजीपणाचे वेल आहेत
माणसांची दक्षता घेण्यासाठी
आज माणसंच फेल आहेत,..?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - रस्त्यावरून चालताना,...

रस्त्यावरून चालताना,...

कधी धो-धो आहे तर
कधी मात्र रिमझिम आहे
रस्त्या-रस्त्यावर पडलेली
मान्सुनची चिम-चिम आहे

रस्त्यावरून चालताना
संभाळूनच चालावे लागते
अन् जसे खड्डे येतील तसे
प्रत्येकाला झूलावे लागते

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

शुक्रवार, १२ जून, २०१५

तडका - अॅडमीशन घेताना

अॅडमीशन घेताना

दिवसें-दिवस वाढणारे
मार्गदर्शक धडे असतात
विद्यार्थ्यांच्या मना-मनात
अँडमीशनचे कोडे असतात

शाळा आणि कॉलेजच्याही
कधी नीयतीत बाक असतो
अँडमीशनला भेडसावणारा
कुठे डोनेशनचा धाक असतो,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - पदव्यांचे बनावटीकरण,...!

पदव्यांचे बनावटीकरण,...!

रोज नव-नवे नावं पाहून
पाहणारेही खिन्न आहेत
कित्तेकांच्या पदवीवरती
आता प्रश्नचिन्ह आहेत,.!

सिस्टम हाती आल्यावरती
हवी तशी पिळवता येते,.?
बोगसबाजी करून देखील
इथे पदवी मिळवता येते,.?

या बोगसबाजीनं कुणा-कुणाचे
चारित्र्यही गमावले आहेत,..!
अन् बनावट पदवी प्रकरणात
आता भुजबळही सामावले आहेत,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

गुरुवार, ११ जून, २०१५

तडका - नापासांसाठी

नापासांसाठी,...

विद्यार्थ्यांच्या कल्याणाला
वेळेवरतीच धावले आहे
अन् नापासांच्या हितासाठी
सरकारही सरसावले आहे

आता अॉक्टोबरच्या वेटिंगची
काहींना गरज भासणर नाही
अन् वर्ष वाया जाण्याची भीती
नापासांनाही असणार नाही,.!

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - कुकर्माचे दणके

कुकर्माचे दणके,...

विश्वास टाकलेले माणसंच
घोटाळ्यांनी बाटले आहेत
उतले आहेत-मातले आहेत
कुणी विवेकही कातले आहेत

उतलेल्या अन् मातलेल्यांचे
वारंवार जणू फणके असतात
मात्र ज्याच्या-त्याच्या कुकर्माचे
ज्याला-त्यालाच दणके असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३

बुधवार, १० जून, २०१५

तडका - महायुतीच्या नावानं,...

महायुतीच्या नावानं,...

सत्ता मिळविण्यासाठी जरी
गोडीनं एकवटलेलेे आहेत
तरीही मात्र सत्तेमधून
घटकपक्ष घटलेले आहेत

अस्तित्व टिकविण्यासाठी
कुणी अजुनही पीचत आहे
अन् महायुतीच्या नावानं
एकीचं बळ खचत आहे,.?

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो.९७३०५७३७८३