हा ब्लॉग शोधा

गुरुवार, ४ जून, २०१५

तडका - अंधश्रध्दा

अंधश्रध्दा

जिथे श्रध्दा जोपासली जाते
तिथे अंधश्रध्दा पोसत असते
अन् नको-नको त्या समस्यांनी
जनता इथली ग्रासत असते

कितीही प्रबोधन करा कुणीही
जनतेला फरक ना पडतो आहे
अन् दिवसें-दिवस अंधश्रध्देचा
कळस वर-वरतीच चढतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - अंधश्रध्दा

अंधश्रध्दा

जिथे श्रध्दा जोपासली जाते
तिथे अंधश्रध्दा पोसत असते
अन् नको-नको त्या समस्यांनी
जनता इथली ग्रासत असते

कितीही प्रबोधन करा कुणीही
जनतेला फरक ना पडतो आहे
अन् दिवसें-दिवस अंधश्रध्देचा
कळस वर-वरतीच चढतो आहे,.!

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

मंगळवार, २ जून, २०१५

तडका - गरळ ओकणारांनो

गरळ ओकणारांनो

एकदा गरळ ओकुन
तोंड जरी गार पडतं
तरी ओकल्या गरळीनं
वातावरण जाम तापतं

पण कमजोर असलेल्यांनी
भंपकबाज ना आशा धरावी
अन् आपली औकात पाहूनच
इनामदारीची भाषा करावी

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - हे वटवृक्षा

हे वटवृक्षा

हे वटवृक्षा आम्हाला माफ कर
आम्ही अजुनही समजलो नाही
अन् वडाला दोरा बांधतानाही
अजुन सुध्दा लाजलो नाही

वृक्षतोडीने होणारा दुष्परिणाम
आता मानसांनाच जाणावा लागेल
अन् भावी वटपोर्णिमांसाठी वड
बाजारांतुनच आणावा लागेल,.?

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

सोमवार, १ जून, २०१५

तडका - वास्तव समाजाचे

वास्तव समाजाचे

मोर्चे झाले आंदोलनं झाली
आरक्षण अजुनही दुर आहे
संघर्ष करूनही संघर्षितांची
अपेक्षा चकणाचुर आहे

समाजात मात्र कित्तेकांच्या
जीवनात दारिद्रय नीच आहे
जुने जाऊन जरी नवे आलेत
परिस्थिती मात्र तीच आहे

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३

तडका - वास्तव वाढदिवसांचे

वास्तव वाढदिवसांचे

लहाना पासुन थोरांपर्यंत
जणू भुषण झाली आहे
वाढदिवस साजरा करण्याची
इथे फँशन आली आहे

चढत्या वयाचे वाढदिवस
आनंदाने मन नाचवु लागतात
मात्र उतरत्या वयाचे वाढदिवस
वयाचा धाक दाखवु लागतात

विशाल मस्के
सौताडा,पाटोदा,बीड.
मो.९७३०५७३७८३