हा ब्लॉग शोधा

शनिवार, २१ मार्च, २०१५

तडका - आरोप-प्रत्यारोप करताना

आरोप प्रत्यारोप करताना,...

समजु शकणार्‍या गोष्टींचे
कधी गैरसमज होऊ नयेत
फालतु अफवांच्या बळीही
आपल्या भावना जाऊ नयेत

प्रत्येक गोष्टीतली सत्यताही
चिकित्सकपणे जाणली जावी
आरोप-प्रत्यारोप करताना
आपली बुध्दी ना हिनली जावी

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

तडका - शुभ अशुभ

शुभ-अशुभ

कुणासाठी गारवा असतात
तर कुणासाठी उब असतात
कुणासाठी शुभ तर कधी
कुणासाठी अशुभ असतात

वेग-वेगळ्या भावनेच्या
वेग-वेगळ्या दृष्टी असतात
वेग-वेगळ्या नजरेमधून
वेग-वेगळ्या गोष्टी असतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

शुक्रवार, २० मार्च, २०१५

तडका - गुढी पाडवा

गुढी पाडवा

पारंपारिक असली जरी
नव्या-नव्याने थाटली जाते
नव-वर्षाच्या स्वागताला
रूढीची गुढी नटली जाते

मना-मनात आपुलकी अन्
आनंदाचा गोडवा असतो
मरठी माणसांचं नवं साल
असा हा गुढी-पाडवा असतो

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

तडका - हे नवल नव्हे

हे नवल नव्हे,...

सरळ सरळ चालणारे
सरळ सरळ ठकू शकतात
कधी धनुष्याच्या बाणाचेही
इथे नेम चुकू शकतात

विश्वासाचे विश्वासही केवळ
इथे फक्त भासुन जातात
अन् कमलपुष्पातही म्हणे
घड्याळी काटे दिसुन येतात

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

गुरुवार, १९ मार्च, २०१५

तडका - क्रांतीवादी विचार

क्रांतीवीदी विचार

इतिहास हळहळला जाईल
भविष्काळ गहिवरला जाईल
इथल्या चळवळीचा इतिहास
जेव्हा-जेव्हा पाहिला जाईल

इथल्या क्रांतीकारांचे बलिदान
चळवळीची साक्ष असतील
अन् त्यांचे क्रांतीवादी विचार
भविष्याचेही भविष्य असतील

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

२० मार्च २०१५ दै. प्रजापत्र

तडका - भारतीयांचा हक्क

भारतीयांचा हक्क

विजयाच्या राशीतुन
मागं कधी सरला नाही
खेळ खेळला असा की
एकही डाव हरला नाही

भारतीयांच्या या खेळीनं
जग साराच थक्क असेल
अन् अशा खेळीनं भारतीयांचा
विश्वचषकावरही हक्क असेल

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783

काका

काका,...

काका तुम्ही सोडून गेलात
याला मन संमत नाही
अन् श्रध्दांजली देण्याची
आमच्यामध्ये हिंमत नाही

गहिवरलं काळीज जरी
धरणी स्थिर राहिली नाही
आभाळाची भकास काया
अशी कधीच पाहिली नाही

कानात गुंजतो अजुनही
काका तुमचा आवाज
कसा विश्वास ठेवावा की
तुम्ही नाहित इथे आज

तुमच्या विचारानं विचार
समाजाचे बदलत आहेत
तुमचे उपदेशात्मक बोल
कानावरती आदळत आहेत

तुमचं हूबेहूब चित्रही
डोळ्यांपूढं साकारतं आहे
काका तुमच्या जाण्याला
मन आज नाकारतं आहे

तुमची वैचारिक क्रांती
मना-मनात रुजली आहे
सुरू राहिल ही चळवळ मात्र
मशाल आज विझली आहे,...

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. 9730573783