हॅप्पी न्यु इयर
सालाने काळ पुढे सरकता
मनात चेतना आली जाते
शुभेच्छांची आयात-निर्यात
मग ऊत्साहाने केली जाते
वार्षिक सुख-समृध्दीच्या आशा
ढोबळ मनाने धाडल्या जातात
अन् वाइट क्षणांच्या पालव्याही
निर्गमन्याआधी खुडल्या जातात
अशीच आपुलकी टिकुन राहो
मनात हिच प्रबळ इच्छा आहे
हिच वर्षानुवर्षे माणवतेसाठी
आमची शुभेच्छा सदिच्छा आहे
अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा