हा ब्लॉग शोधा

गुरुवार, २३ नोव्हेंबर, २०१७

तडका - नेट

नेट

इंटरनेटच्या बाजारात
बघा नेट झालंय स्वस्त
म्हणूनच हल्ली लोक
वापरू लागले जास्त

वापर निश्चित करावा
अतीआहारी जाऊ नये
आणि दैनिक कामांचा
खोळंबाही होऊ नये

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, २२ नोव्हेंबर, २०१७

तडका - इफेक्ट

इफेक्ट

खुर्चीला करून केंद्रबिंदु
आरोप-टिका तावुन आहेत
गुजरातच्या राजकारणावर
सर्वच वॉच ठेऊन आहेत

राजकीय रंग-ढंग पाहिले तर
इलेक्शन जबरे घासुन होईल
पण कुणाचा इफेक्ट किती आहे
हे निकालातुनच दिसुन येईल

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०१७

तडका - जुना बाजार

जुना बाजार

जुने हवे तर विकत घ्या
जुने झाले ते विक्री करा
हव्या-नको त्या वस्तुंची
ऑनलाइनच डिक्री करा

सेवा-सुविधा पुरवणारी
हि ऑनलाइन घडी आहे
जुन्या वस्तुंच्या व्यवहारात
फेसबुकचीही ऊडी आहे

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

सोमवार, २० नोव्हेंबर, २०१७

तडका - कटाक्ष

कटाक्ष

कुणी कुणाचे लुटत आहेत
कुणा-कुणाचे फूटत आहेत
गुजरात मधून रंगबाज असे
राजकीय वारे ऊठत आहेत

गुजरात मधील निवडणूकीवर
हल्ली देशभरातुन लक्ष आहे
जो राजकारण बाह्य वागतो आहे
त्याचाही वाकडा कटाक्ष आहे

अॅड- विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, जि. बीड.
मो. ९७३०५७३७८३

शुक्रवार, १७ नोव्हेंबर, २०१७

तडका - सिनेमा वाद

सिनेमा वाद

हल्ली सिनेमा अडवणे
हि जणू रीत झाली आहे
सिनेमांना विरोध करण्या
लोकांना प्रीत झाली आहे

नवा विषय म्हटलं की
नव-नवे वाद पेटु लागतात
सिनेमा माहित नसणारेही
वाद खेळण्या ऊठू लागतात

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

बुधवार, १५ नोव्हेंबर, २०१७

तडका - आंदोलनं

आंदोलन

आंदोलनांतील प्रश्नावरती
तत्परतेने तोडगे काढावेत
पण आंदोलनं करता करता
आंदोलनकर्ते ना पीडावेत

आंदोलनंही करावेत असे की
विरोधकही बनावे प्रशंसक
पण ऊगीच ऊग्र स्वरूपाचे
आंदोलनं नसावेत विध्वंसक

अॅड. विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३

तडका - रण इलेक्शन

रण इलेक्शन

इलेक्शनच्या रणांगणात
होऊ लागल्या फायरी
कुणाकडे टिका आहेत
तर कुणाकडे शायरी

जो-तो आपल्या पद्धतीने
हि प्रचारकी करतो आहे
आरोप आणि टिकांसह
विरोधकांना घेरतो आहे

विशाल मस्के
सौताडा, पाटोदा, बीड.
मो. ९७३०५७३७८३